हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन

हिमाचल प्रदेशाच्या विविध भागांत काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या अनेक मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. कांगड़ा, मंडी, कुल्लू, ऊना, हमीरपुर, बिलासपुर, सोलन, सिरमौर आणि सिमला इथं हवामान विभागानं जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.