डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नेपाळमध्ये भूस्खलनामुळे दोन बस नदीत वाहून गेल्या

नेपाळमध्ये भूस्खलन झाल्यामुळे दोन प्रवासी बस आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या नदीत वाहून गेल्या. दोन्ही बसमध्ये एकूण ६५ प्रवासी होते, यात ७ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. चितवन जिल्ह्यात नारायणघाट – मुगलिंग पट्ट्यात भूस्खलन झाल्यामुळे या बस त्रिशूली नदीत पडल्या.  यातल्या बीरगंजहून काठमांडूला चाललेल्या बसमध्ये ७ भारतीय प्रवास करत होते. नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलानं घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरु केलं असून प्रधानमंत्री पुष्पकमल दहल यांनी आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीनं करण्याचे निर्देश दिले आहेत.