‘लॅम रिसर्च’ कंपनी भारतात १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार – मंत्री अश्विनी वैष्णव

लॅम रिसर्च ही कंपनी भारतात 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. भारताच्या सेमीकंडक्टर निर्मिती प्रवासातला हा आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प असल्याचं वैष्णव यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशाच्या सेमीकंडक्टर अभियानाचा एक भाग म्हणून या उद्योगात गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं जात आहे. भारताला सेमीकंडक्टर डिझाईन क्षेत्राचं जागतिक केंद्र बनवणं हा या अभियानाचा उद्देश आहे. लॅम रिसर्च ही अमेरिकन कंपनी सेमी कंडक्टर निर्मिती क्षेत्रात जगात पहिल्या क्रमांकावर आहे.