भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत लक्ष्यने चायनीज तैपेईच्या चाऊ टिएन-चेन याचा १७-२१, २४-२२, २१-१६ असा पराभव केला.
उत्कृष्ट नेट ड्रॉप्स, अचूक स्मॅश आणि आत्मविश्वासपूर्ण फटक्यांच्या बळावर लक्ष्यनं अंतिम फेरी गाठली. लक्ष्य सेनचा अंतिम सामना आज जपानच्या युशी तनाकाशी होणार आहे. चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी पुरुष दुहेरीच्या उपउपांत्य फेरीत पराभूत झाल्यानं स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.