डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 1, 2024 3:28 PM

printer

आज लक्ष्मीपूजना दिवशी शेअर बाजारात होणार मुहूर्ताचे सौदे

दीपावलीच्या प्रकाश पर्वानिमित्त देशभरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. घरोघरी आकाश कंदील, पणत्या, विजेच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई, रांगोळ्या, या बरोबरीनं आप्तजनांच्या भेटीगाठी, फराळाच्या पदार्थांची मेजवानी असं चैतन्याचं वातावरण आहे.

 

आज संध्याकाळी लक्ष्मी पूजन होणार असून त्यासाठी झेंडूच्या फुलांनी आणि तोरणांनी बाजरपेठा सजल्या आहेत. दिवाळी निमित्त अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजनही ठिकठिकाणी केलं जात आहे. महाराष्ट्रात पुणे मुंबईसह सर्वच शहरात दिवाळी पहाट कार्यक्रमांची रेलचेल आहे. अनेक सामाजिक संस्थांमार्फत अन्नदान, वस्त्रदान असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.