ग्रीसमध्ये सुरु असलेल्या, १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत, भारतीय कुस्तीगीर लैकी यानं पुरुषांच्या ११० किलो फ्रीस्टाइलमध्ये रौप्यपदक जिंकलं. दरम्यान, आणखी एक भारतीय कुस्तीगीर सिटेंडरनं पुरुषांच्या ६० किलो फ्रीस्टाइलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिटेंडरनं उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या बेकासिल असाम्बेकचा पराभव केला.
भारताच्या गौरव पुनियाला ६५ किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या कांस्य लढतीत इराणच्या मोर्तेझा मुल्ला मोहम्मदीकडून पराभव पत्करावा लागला.