लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आगाऊ रक्कम द्यायला निवडणूक आयोगाची मनाई

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल; पण जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात द्यायला राज्य निवडणूक आयोगानं मनाई केली आहे. १४ जानेवारीपूर्वी लाभार्थींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे तीन हजार जमा होणार, अशा आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी आल्या होत्या. त्यावर राज्य निवडणूक आयोगानं मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला होता.  

 

याबाबत राज्य निवडणूक आयोगानं काढलेल्या आदेशांमधल्या तरतुदींनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेली विकासकामं आणि योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवायला परवानगी आहे, असं मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात कळवलं. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगानं हे निर्देश दिले आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.