लदाखच्या लेह जिल्ह्यात जनजीवन पूर्वपदावर येत आहे. काही दिवसांपूर्वी हिंसक आंदोलनानंतर तिथं तणाव निर्माण झाला होता. आता प्रशासनानं सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळात संचारबंदी शिथिल केली आहे. मात्र मोबाईल डेटा सेवा अद्याप बंद आहे. शाळा सुरू झाल्या असून बस आणि टॅक्सी वाहतूकही सुरू झाली आहे.
दरम्यान, लदाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेतल्याच्या विरोधात त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाला दसऱ्याची सुट्टी असल्यानं यावर सुनावणी कधी होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. वांगचुक यांना २६ सप्टेंबर रोजी लडाखमधून अटक झाली होती आणि सध्या ते जोधपूरच्या कारागृहात आहेत.
 
									 
						 
									 
									 
									