डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

खेळांना महत्व प्राप्त व्हावं यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणीनं राष्ट्रीय क्रीडा संहितेचं काटेकोर पालन करत राज्यस्तरीय निवडणूक पार पाडावी, तसंच कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत राज्य कबड्डी असोसिएशन सल्लागार समिती आणि कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. येत्या शुक्रवारी कार्यकारिणीसाठी निवडणूक होणार असून, १९ जून ही जिल्हानिहाय मतदारांची नावं स्विकारण्याची अंतिम तारीख असल्याचं त्यांनी सांगितलं. खेळांना महत्व प्राप्त व्हावं यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. बैठकीला उपाध्यक्ष आमदार भाई जगताप, दिनकर पाटील, शकुंतला खटावकर, बाबुराव चांदेरे उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.