October 13, 2025 1:26 PM | Lalu Prasad Yadav

printer

आयआरसीटीसी घोटाळ्यात राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी आणि मुलगा तेजस्वी यांच्यावर आरोप निश्चित

आयआरसीटीसी घोटाळ्यात  राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव यांच्यावर दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी या तिघांसह अन्य आरोपींवर भ्रष्टाचार, गुन्हेगारी कट आणि फसवणुकीचे आरोप निश्चित केले आहेत. 

 

रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यादव हे रेल्वे मंत्री असताना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने २००४ ते २००९ दरम्यान एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यासाठी जमिनीच्या स्वरुपात लाच स्वीकारल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. तसंच, रांची आणि पुरी इथल्या दोन आयआरसीटीसी हॉटेल्सचं कंत्राट अवैध पद्धतीने सुजाता हॉटेल्स या कंपनीला चालवण्यासाठी दिल्याचा आरोपही यादव यांच्यावर आहे.

 

त्या बदल्यात कोट्यवधी रुपये किमतीची जमीन पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यांच्याशी संबंधित कंपनीला कमी मूल्याने हस्तांतरित करण्यात आल्याचंही सीबीआयने आपल्या आरोपात म्हटलं आहे.