मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतल्या २६ लाख लाभार्थ्यांची छाननी करण्याचे आदेश राज्य सरकारनं जिल्हा पातळीवरच्या यंत्रणेला दिले आहेत. सर्व जिल्ह्यातले हे लाभार्थी अपात्र असल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं कळवलं आहे.
त्यांची प्रत्यक्ष छाननी करण्याचे आदेश महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. छाननीनंतर त्यांची पात्रता-अपात्रता ठरणार आहे. अपात्र लाभार्थ्यांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.