देशातलं अन्न धान्य उत्पादन यंदा ३५ कोटी ७ लाख टनांवर जाईल असा अंदाज असल्याचं आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितलं. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ पूर्णांक ६५ शतांश टक्के तर 2014-15 मधे झालेल्या उत्पादनाच्या तुलनेत बेचाळीस टक्के असल्याचं त्यांनी नमूद केलं.
महाराष्ट्र, पंजाब, जम्मूकाश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे धान्य उत्पादनात घट झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.