August 22, 2024 9:28 AM

printer

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचा टपाल विभागासोबत सामंजस्य करार

खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं टपाल विभागासोबतच्या एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार आता टपाल विभागाचे कर्मचारी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत देशभरात स्थापन होत असलेल्या नवीन विभागांची प्रत्यक्ष पडताळणी करतील. त्यासाठी टपाल विभागातील कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही देण्यात येईल. टपाल विभागाचे उपमहाव्यवस्थापक डॉ. अमनप्रीत सिंग आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजन बाबू यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.