डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 24, 2025 3:53 PM | Kunal Kamara

printer

कुणाल कामरा विरोधात एफआयआर दाखल, तोडफोड प्रकरणी ११ जणांना अटक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथितरीत्या अपमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसंच या कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्या स्टुडिओत झालं, त्या स्टुडिओची आणि हा स्टुडिओ असलेल्या हॉटेलची तोडफोड करणाऱ्या ४० शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्धही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. दरम्यान, कुणाल कामरानं माफी मागावी, नाहीतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानभवन परिसरात दिला. राज्यघटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला असला, तरी त्याचा स्वैराचार होता कामा नये. अशा प्रकारे कुणाचाही अपमान सहन करणार नाही, असं ते म्हणाले. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या शाब्दिक वादाला तोंड फुटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा