डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

KumbhMela 2027 : नाशिकला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचं विस्तारीकरण होणार

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी नाशिक शहराला जोडणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांचं विस्तारीकरण करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. नाशिक मधे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधल्या हैदराबाद हाऊस इथं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आढावा बैठक घेतली, त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. नाशिकमधे इतर सुविधा करण्याबाबतही केंद्रीय मंत्री  गडकरी यांनी मान्यता दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांना सांगितलं.

 

यासोबतच नागपुरातील नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा अंतर्गत जपानमधील जायका पुरस्कृत कंपनीद्वारे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, भूमिगत वीजवाहिनी तसंच खाजगी बसगाड्यांच्या वाहनतळाबद्दल या बैठकीत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा