अंमली पदार्थ प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड आरोपी कुब्बावाला मुस्तफा याला संयुक्त अरब अमिरातहुन भारतात आणण्यामध्ये केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय ला यश आलं आहे.
सांगली इथं परदेशातून सिंथेटिक ड्रग्ज मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी चालवल्याचा आरोप मुस्तफावर आहे. कुब्बावाला मुस्तफा आणि इतरांशी संबंधित असलेल्या कारखान्यातून २ पूर्णांक ५२२ दशलक्ष रुपये किमतीचे एकूण १२६ किलो मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे.