डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ‘कृषी समृद्धी योजना’ जाहीर

राज्यातल्या शेतकऱ्यासाठी ‘कृषी समृद्धी योजना’ राबवण्याची घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज केली. या योजनेत शेती क्षेत्रात दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे. यासंदर्भात आजच शासकीय अध्यादेश जारी केला आहे, असं कोकाटे यांनी नाशिकमध्ये आयोजित वार्ताहर परीषदेत सांगितलं. 

 

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवणं, पायाभूत सुविधा निर्माण करणं, उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादकता वाढवणं, पिकांमध्ये विविधता आणणं, मूल्यसाखळी बळकट करणं, तसंच  हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणं, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणं हे कृषी समृध्दी योजनेचं उद्दिष्ट आहे.

 

ही योजना डीबीटी अर्थात थेट लाभ हस्तांतरण प्रणालीव्दारे राबविली जाईल. अल्प, अत्यल्प भूधारक, महिला शेतकरी, अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य राहील. यातल्या प्रत्येक घटकाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल.