रेल्वेमंत्री अश्विन कुमार वैष्णव यांनी कोकण रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या ४ गाड्यांपैकी २ गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सिंधुदुर्ग इथं तर २ गाड्यांना कणकवली रेल्वे स्थानकांवर थांबा देण्याची मागणी मान्य केली आहे. याबाबत रेल्वे बोर्डानं परिपत्रकही जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस तसंच एर्नाकुलम – अजमेर मरुसागर एक्सप्रेस या गाड्या सिंधुदुर्ग स्थानकावर तर हिसार – कोयंबतूर एक्सप्रेस आणि गांधीधाम – नागरकोइल एक्सप्रेस या दोन गाड्या कणकवली स्थानकावर थांबणार आहेत.