कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी नमिता कीर यांची तर कार्याध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांची निवड

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी नमिता कीर यांची आणि कार्याध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांची निवड झाली आहे. परिषदेची केंद्रीय वार्षिक सर्वसाधारण सभा काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं झाली. या सभेत पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. मंत्री उदय सामंत आणि आमदार संजय केळकर यांची कोमसापचे विश्वस्त म्हणून निवड केल्याचं डॉक्टर ढवळ यांनी सांगितलं. कोमसापतर्फे देण्यात येणाऱ्या वर्ष २०२३-२४ साठीच्या विविध पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली.