पश्चिम बंगालमधे मध्य कोलकाता इथं एका हॉटेलला काल रात्री लागलेल्या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आतापर्यंत १४ मृतदेह हॉटेलमधून बाहेर काढले असून आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी एक विशेष पथक तयार केलं आहे, अशी माहिती कोलकात्याचे पोलीस आयुक्त मनोज कुमार वर्मा यांनी दिली आहे.