डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आज कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला आहे. शहरातली बहुतांश दुकानं, शाळा-महाविद्यालयं बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शहर परिवहन उपक्रमासाह खासगी वाहतूक व्यवस्थाही बंद असल्यानं कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना पायपीट करावी लागली.

 भाऊसिंगजी रोड, दसरा चौक, पापाची तिकटी या परिसरात घोषणा देणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं.