आयपीएल क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी कलकत्ता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये कलकत्ता इथल्या इडन गार्डन मैदानावर सामना रंगणार आहे.
चेन्नई इथं काल झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद या संघानं यजमान चेन्नई सुपर किंग्स संघाला ५ गडी राखून पराभूत केलं. चिदंबरम स्टेडिअमवर हा सामना पार पडला. सनराईजर्स हैदराबाद संघानं १८ षटक आणि चार चेंडूत १५५ धावांचं लक्ष गाठलं. ईशान किशनने ३४ चेंडूत ४४ धावा करत तर हर्षल पटेल ने ४ गडी बाद करत संघाच्या विजायमध्ये मोठा वाटा उचलला.