शेतकऱ्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी आकाशवाणीवर ‘किसानों की बात’ हा कार्यक्रम

शेतकऱ्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी सरकार आकाशवाणीवर किसानों की बात हा कार्यक्रम सुरू करणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत शेतकऱ्यांशी संवाद साधताना ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या मन की बात या  कार्यक्रमासारखा हा  कार्यक्रम असणार आहे. पुढच्या महिन्यापासून हा कार्यक्रम सुरू होईल. यात कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना माहिती देणार असल्याचं,  त्यांनी यावेळी सांगितलं.