प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या पीएम किसान उत्सव दिवसानिमित्त किसान सन्मान निधीच्या २१व्या हप्त्याचं वितरण करतील. तमिळनाडूत कोईंबतूर इथं मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री देशातल्या ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळून १८ हजार कोटी रुपये जमा करतील.
प्रधानमंत्री नरेंद्रमोदी उद्या आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्रप्रदेशात पुट्टपार्थी इथं श्री सत्य साईबाबांच्या समाधीला ते भेट देतील. श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा गौरव करणारं टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन मोदी यांच्या हस्ते होईल.
तमिळनाडूमधे नैसर्गिक शेतीविषयीचं एक चर्चासत्र तिथल्या कृषी उत्पादक मंचानं आयोजित केलं आहे. त्याला प्रधानमंत्री उपस्थित राहतील.