डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 22, 2025 8:45 PM

printer

शेतकऱ्यांसाठी ‘किसान कॉल सेंटर’ सुरू करण्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची सूचना

शेतकऱ्यांना तातडीनं मार्गदर्शन मिळावं यासाठी ‘किसान कॉल सेंटर’ सुरू करण्याची सूचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. त्यांनी आज पुण्यात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. विभागाच्या डिजिटायझेशनवर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कृषी योजनांची आखणी करताना शेतकऱ्याच्या गरजांचा विचार केंद्रस्थानी असला पाहिजे, असं ते म्हणाले. उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कौतुक आणि सन्मान केला जाईल, मात्र, कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा भरणे यांनी दिला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.