भारतीय समाज हा कायमच एक समावेशक समाज राहिल्याचं प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात इथे भाषा वारसा आणि सांस्कृतिक अभ्यास केंद्राचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालं, तेव्हा ते बोलत होते.
ही फक्त एका अभ्यासक्रमाची सुरुवात नाही, तर भारताच्या सांस्कृतिक वारशात रुजलेल्या त्याच्या उज्ज्वल भविष्याच्या पायाचं मजबुतीकरण असल्याचं रिजिजू यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाशी संलग्न विविध संस्थांमधल्या शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी आणि इतर उपस्थित होते.