डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

किरेन रिजिजु यांच्या उपस्थितीत लोक संवर्धन पर्व कार्यक्रमाचं उद्घाटन

लोक संवर्धन पर्व कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय अल्पसंख्यक कार्यमंत्री किरेन रिजिजु यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीमधल्या राजघाट इथं झालं.  या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजना, कार्यक्रम आणि कामगिरीची माहिती सादर केली जाईल. सरकारने अल्पसंख्यक समुदाय विशेषतः कारागिरांच्या आर्थिक उत्थानासाठी केलेल्या प्रयत्नांविषयीही या कार्यक्रमातून माहिती दिली जाईल.

 

खेड्यातल्या कारागिरांकडे मोठं कसब असून त्यांच्या हस्तनिर्मित वस्तू बाजारात याव्यात यासाठी व्यासपीठ निर्माण करण्यात आल्याचं अल्पसंख्य कार्यमंत्री किरेन रिजिजु यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. वस्तू आणि विविध कलाप्रकारांची देवाणघेवाण करण्यासाठीही हा कार्यक्रम उपयोगी ठरेल असं ते म्हणाले. 

 

सरकारच्या कामाची माहिती देण्याशिवाय या कार्यक्रमात लाखाच्या बांगड्या, निळ्या मातीची भांडी, भरतकाम केलेली वस्त्रं अशा विविध वस्तू प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा