डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत किदांबी श्रीकांत उपांत्य फेरीत दाखल

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतनं आज पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.  उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या तोमा जुनिअर पोपोवला नमवत श्रीकांतनं उपांत्य फेरीत आगेकूच केली आहे.        

 

भारताच्या  मिश्र दुहेरीची तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिल या   जोडीला    मात्र आज पराभव पत्करावा लागला.  चीनच्या वेई याक्सिन आणि जियांग झेनबॅंग या जोडीनं त्यांच्यावर २४-२२, २१-१३ असं अशी मात  केली.  त्यामुळं तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिल या जोडीचं  आव्हान संपुष्टात आलं असून  श्रीकांत हा या स्पर्धेत टिकून राहिलेला  एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा