खो-खो विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष संघांचा क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते सन्मान

खो-खो विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष संघांना आज नवी दिल्ली इथं केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. दोन्ही संघांमधल्या खेळाडूंचं मांडवीय यांनी कौतुक केलं. भारताच्या पारंपरिक खेळाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून दिल्याबद्दल दोन्ही संघांचं त्यांनी अभिनंदन केलं. २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तसंच २०३६ च्या ऑलिंपिक स्पर्धेत खो खो चा समावेश करण्यासाठी सामुहिक प्रयत्न करावे लागतील, असं मांडवीय यावेळी म्हणाले.