January 13, 2025 8:52 PM | Kho-Kho WorldCup

printer

खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व प्रतीक वाईकर आणि प्रियांका इंगळेकडे

पहिल्या खो-खो विश्वचषक २०२५ ला आजपासून नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी मैदानावर सुरुवात झाली. या स्पर्धेत २० पुरुष संघ तर १९ महिला संघ सहभागी होत आहेत. आज या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा पहिला सामना नेपाळविरुद्ध सुरु आहे. या सामन्याचं थेट प्रक्षेपण दूरदर्शन स्पोर्ट्स वाहिनीवर पाहता येईल.

 

पुरुष संघाचं नेतृत्व प्रतीक वायकर करत असून प्रियांका इंगळे ही महिला संघाची कर्णधार आहे. या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना १९ जानेवारी रोजी होणार आहे.