खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघ विजयी

भारताच्या महिला संघानं पहिल्यावहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत नेपाळच्या संघावर ७८-४० अशी मोठ्या फरकानं मात करून विजेतेपदावर नाव कोरलं आहे. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोर स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या सामन्यात भारतानं पहिल्यापासूनच निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि नेपाळला रोखून धरलं. भारताच्या पुरुष संघाचा सामना आज रात्री नेपाळविरुद्ध होणार आहे.