January 13, 2025 9:03 PM

printer

खो-खो विश्वचषक स्पर्धेचं भारतीय संघाचं नेतृत्व प्रतीक वाईकर आणि प्रियांका इंगळेकडे

खो-खो विश्वचषक २०२५ला आजपासून नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी मैदानावर सुरु. या स्पर्धेत २० पुरुष संघ तर १९ महिला संघ सहभागी झाले आहेत. आज या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा पहिला सामना नेपाळविरुद्ध सुरु आहे. या सामन्याचं थेट प्रक्षेपण दूरदर्शन स्पोर्ट्स वाहिनीवर  पाहता येईल.

 

पुरुष संघाचं नेतृत्व प्रतीक वायकर करत असून प्रियांका इंगळे ही महिला संघाची कर्णधार आहे. या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना १९ जानेवारी रोजी होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.