डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

खेलो इंडिया हिवाळी क्रिडा स्पर्धा लांबणीवर

यावर्षीच्या खेलो इंडिया हिवाळी क्रिडा स्पर्धेचा दुसरा आणि अखेरचा टप्पा पुरेशी बर्फवृष्टी न झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. स्पर्धांसाठी हवामान अनुकूल झाल्यानंतर सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाईल. असं क्रिडा मंत्रालयानं कळवलं आहे. गेल्या महिन्याच्या २३ ते २७ तारखेपर्यंत लडाखमध्ये एनडीएस स्पोर्ट्स मैदान आणि गुफुक तलाव इथं आइस हॉकी आणि आइस स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावर्षी विविध राज्यं, केंद्रशासित प्रदेश आणि इतर संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे १९ संघ सहा क्रिडा प्रकारांमध्ये सहभागी झाले आहेत. पहिल्या टप्प्यात लडाख सध्या चार सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदकांसह पदक तालिकेत आघाडीवर आहे.