खेलो इंडिया हिवाळी खेळांचा दुसरा टप्पा आज समाप्त होणार

खेलो इंडिया हिवाळी खेळांचा दुसरा टप्पा आज गुलमर्ग इथं समाप्त होणार आहे. समारोप समारंभाला केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय उपस्थित राहणार आहेत. या खेळांचा पहिला टप्पा २३ ते २७ जानेवारी दरम्यान लडाखमध्ये यशस्वीरित्या पार पडला. इथल्या एनडीएस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि गुफुक तलाव इथं आइस हॉकी आणि आइस-स्केटिंग स्पर्धा झाल्या. भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि जम्मू-काश्मीर क्रीडा परिषदेनं या स्पर्धांचं उत्कृष्ट नियोजन केल्याचं भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे उपमहासंचालक विनीत कुमार यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं.