खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाचा लोगो आणि शुभंकर चिन्हाचं अनावरण

पहिल्यावहिल्या खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाचा लोगो आणि शुभंकरचिन्हाचं अनावरण आज श्रीनगर इथं झालं. हिमालयीन खंड्या हे या कार्यक्रमाचं शुभंकरचिन्ह असून याच्या लोगोमध्ये काश्मीरचं निसर्गसौंदर्य रेखाटण्यात आलं आहे. ही स्पर्धा श्रीनगरच्या दल लेक इथं २१ ते २३ ऑगस्टदरम्यान होणार आहे. यात ३६ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधून ४००पेक्षा जास्त खेळाडू रोविंग, कनूइंग आणि कायाकिंग या स्पर्धांमध्ये भाग घेतील.