डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

Khelo India Para Games : महाराष्ट्रतील खेळाडूंनी पटकावली १४ सुवर्णपदकं

नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत राज्यातल्या खेळाडूंनी आतापर्यंत १४ सुवर्णपदकांसह एकंदर ३६ पदकं पटकावली आहेत. यात मैदानी स्पर्धांमधल्या १० सुवर्णपदकांचा समावेश आहे. भालाफेकमध्ये एफ १३ या प्रकारात प्रतीक पाटीलनं कास्यपदक तर कोल्हापूरच्या स्नेहल बेनाडे हिनं महिलांच्या गोळाफेकमध्ये रौप्यपदक जिंकलं. महिलांच्या एफ ५६ प्रकारात मीना पिंगाने हिनं थाळीफेक करत तिसरं स्थान मिळवलं. राजश्री कासदेकर हिनं भालाफेकमध्ये कास्यपदक प्राप्त केलं.