पहिल्या ‘खेलो इंडिया किनारी क्रीडा’ स्पर्धेचं उद्घाटन

पहिल्या खेलो इंडिया किनारी क्रीडा स्पर्धाचं उद्घाटन केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते करण्यात आलं. दीवमधल्या घोघला किनाऱ्यावर झालेल्या नेत्रदीपक उद्घाटन सोहळ्यात पारंपरिक नृत्यप्रकारांचे सादरीकरण झालं. येत्या 2047 पर्यंत भारत क्रीडा क्षेत्रातली महासत्ता होण्यास कटिबद्ध असल्याचं मांडवीय उद्घाटनावेळी बोलताना म्हणाले. खेलो इंडिया बीज गेम्स हा देशाच्या क्रीडा इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.