डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 23, 2025 12:01 PM | Khelo India

printer

इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्र प्रथम स्‍थानावर

दीवच्‍या घोघला समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्‍या खेलो इंडिया बीच स्पर्धेत 4 सुवर्ण, 4 रौप्‍य आणि 6 कास्य पदकांसह 14 पदकांची लयलूट करत महाराष्ट्राने प्रथम स्‍थानावर झेप घेतली आहे. कालच्या तिसऱ्या दिवशी 50 ते 55 किलो वजनी गटात जयश्री शेटे हिने सुवर्ण कामगिरी केली. रामचंद्र बदक आणि सचिन गर्जे, ओंकार अभंग, वैभव काळे आणि अंशुल कांबळे यांनी आपापल्या गटात रौप्‍य पदकं पटकावली. कबड्डीमध्ये महिला गटात  महाराष्ट्राने उपांत्‍य फेरीत प्रवेश केला.