May 12, 2025 1:23 PM

printer

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र ८० पदकांसह अव्वल स्थानी कायम

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ८० पदकांची लयलूट करत महाराष्ट्रानं पदकतालिकेतलं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. यात ३० सुवर्ण आणि २५ रौप्यपदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटक ४२ पदकांसह दुसऱ्या तर राजस्थान २४ पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

 

खेलो इंडियाचा आज नववा दिवस असून आज दिवसभरात मुष्टियुद्ध, टेनिस आदी खेळांचे सामने होणार आहेत. तसंच कलरीपयट्टू आणि थांग हे दोन नव्यानं समाविष्ट केलेले खेळही आज खेळले जातील.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.