केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज ‘खतबात ए मोदी- लाल किले की फासील से’ या उर्दू भाषेतल्या पुस्तकाचं नवी दिल्लीत अनावरण केलं. आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात त्यांनी ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ ते २०२५ दरम्यान स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केलेल्या सर्व भाषणांचं संकलन या पुस्तकात आहे. त्याशिवाय अंत्योदय आणि स्वच्छ भारत तसेच इतर राष्ट्रीय महत्वाच्या संकल्पनांवरही या पुस्तकात माहिती दिल्याचं प्रधान यांनी संदेशात म्हटलं आहे.
Site Admin | January 5, 2026 6:19 PM
खतबात ए मोदी- लाल किले की फासील से’ पुस्तकाचं अनावरण