महाराष्ट्रात मुंबई इथं आजपासून खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा सुरू होत आहे. भारतीय पारंपरिक खेळांच्या या स्पर्धेत 15 हजारांपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल स्पर्धेच्या तयारीची पाहणी केल्यानंतर ही माहिती दिली.
लेझीम, फुगडी, लगोरी, विट्टी दांडू यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील साहसी क्रीडा प्रकारांचा यात समावेश आहे. तसंच कबड्डी, खो खो, मल्लखांब, पावनखिंड स्प्रिंट, कुस्ती, दोरी उडी आणि योग यांच्या पुरुष आणि महिला गटातल्या स्पर्धा होतील.