देशात यंदा खरीप पिकांचं विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. त्यात अन्नधान्याच्या उत्पादनात ३८ लाख ७० हजार टनांनी वाढ होईल असा अंदाज आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यंदाच्या खरीप हंगामातल्या उत्पादनाचे अंदाज देणारा पहिला अहवाल आज नवी दिल्लीत प्रकाशित केला. देशात यंदा अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं असलं तरी अनेक भागात चांगला पाऊस झाल्यानं पिकांना फायदा झाला असल्याचं चौहान यांनी सांगितलं. एकूण अन्नधान्य उत्पादन १७ कोटी ३३ लाख ३० हजार टन होण्याची शक्यता आहे.
Site Admin | November 26, 2025 8:01 PM | Kharif Crops
देशात यंदा खरीप पिकांचं विक्रमी उत्पादन अपेक्षित