सिक्कीममधल्या ‘खांगचेंडझोंगा’ राष्ट्रीय उद्यानाला चांगल्या श्रेणीचा दर्जा

नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांच्या ताज्या जागतिक अहवालात देशातल्या सिक्कीम राज्यामधल्या ‘खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यानाला’ चांगल्या श्रेणीचा दर्जा मिळाला आहे. IUCN अर्थात इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झरव्हेशन ऑफ नेचर या संस्थेनं हा अहवाल सादर केला आहे. चांगल्या श्रेणीचा दर्जा मिळालेलं हे  एकमेव भारतीय उद्यान आहे. या उद्यानात सुमारे २८० हिमनद्या, ७० पेक्षा अधिक तलाव, वन्यप्राण्यांच्या विविध प्रजाती तसंच साडेपाचशे पेक्षा अधिक पक्ष्यांचा निवास आहे. त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांचं हे उद्यान म्हणजे श्रद्धास्थान आहे. २०१८मध्ये विस्तारित झालेला ‘खांगचेंडझोंगा बायोस्फिअर रिझर्व्ह’ मुख्य संरक्षित क्षेत्रांना बफर झोनशी जोडतो, यामुळे मानवाचं निसर्गाशी असलेलं नातं अधिक दृढ व्हायला मदत होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.