जेजुरीत सोमवती अमावस्येनिमित्त खंडोबा यात्रेत लाखो भाविकांची मांदियाळी

जेजुरीमध्ये आज सोमवती अमावस्येनिमित्त भरलेल्या खंडोबा यात्रेत राज्यभरातून लाखो भाविक आले होते. दुपारी १ वाजता पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ झाला. यानंतर बंदुकीच्या फैरी झाडत सोहळ्याला सलामी देण्यात आली. गडकोटाबाहेर सोहळ्याने प्रस्थान ठेवल्यानंतर पायरीमार्ग, ऐतिहासिक चिंच बागेतील गौतमेश्वर मंदिर मार्गे जानुबाई चौकातून शिवाजी चौक मार्गे हा सोहळा कन्हा नदीकडे मार्गस्थ झाला. यावेळी संस्थानचे मुख्य विश्वस्त, व्यवस्थापक, कर्मचारी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.