अमेरिकेत, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशननं मोठी कारवाई करत देशभरातून आठ खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये पंजाबमधील पवित्तर सिंग बटाला हा बंदी घातलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित दहशतवाद्याचाही समावेश आहे.
या कारवाई दरम्यान एफबीआयनं बंदुका, दारूगोळा आणि रोख रक्कम देखील जप्त केली. भारतीय गुप्तचर यंत्रणेनुसार, हे सर्व संशयित आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाळ्याचा भाग आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.