केरळात आज अतिशय जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्रविभागाने वर्तवला असून ५ जिल्ह्यांसाठी रेड ॲलर्ट दिला आहे. या ठिकाणी आज शाळांना सुट्टी दिली होती. कासारगोड आणि कन्नूरला उद्यासाठी देखील रेड ॲलर्ट दिला आहे. वायनाडमधे गेल्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्यामुळे मुंदक्की चूरलमाला परिसरात प्रवेशावर निर्बंध घातले आहेत.
Site Admin | July 19, 2025 8:43 PM | IMD weather | Kerala | Red alert
केरळात अतिशय जोरदार पाऊस, ५ जिल्ह्यांसाठी रेड ॲलर्ट
