September 12, 2024 8:22 PM

printer

केरळमध्ये बिगर भाजपशासित पाच राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या एक दिवसीय संमेलन

देशाचे दरडोई उत्पन्न आणि विकासाच्या विविध स्तरानुसार राज्यांमध्ये करांचे संतुलित वितरण व्हावं, अशी अपेक्षा केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी व्यक्त केली आहे. ते आज केरळमधे तिरूअनंतपूरम इथं आयोजित बिगर भाजपशासित पाच राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या एक दिवसीय संमेलनात बोलत होते. यावेळी तेलंगणा, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू आणि केरळ राज्यांच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत १६ वा वित्त आयोग आणि केंद्र आणि राज्य सरकारमधील वित्तीय संबंधाशी संबधित इतर मुद्द्यांवर चर्चा झाली.