केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपप्रणित एनडीएचा तिरुवनंतपुरम महानगरपालिकेवर विजय

केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत १०१ पैकी ५० जागा जिंकून विजय मिळवला आहे. त्यासोबतच इतर ठिकाणीही एनडीएनं चांगली कामगिरी केली आहे. सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वातल्या लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ्रंटला गेल्या वेळच्या तुलनेत बऱ्याच ठिकाणी फटका बसला. काँग्रेसप्रणित युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटनं ३६७ ग्रामपंचायतींमध्ये बहुमत मिळवलं, तर एलडीएफला २३४ ठिकाणी विजय मिळाला. एनडीएला पाच ग्रामपंचायतींमध्ये बहुमत मिळालं. महानगरपालिकांमध्ये यूडीएफनं तीन ठिकाणी विजय मिळवला. पलक्कड ग्रामपंचायतीत एनडीएनं गेल्या वेळप्रमाणेच चांगली कामगिरी करत ५३ पैकी २५ जागा जिंकून आपली जागा बळकट केली. एकंदर १४ जिल्हा पंचायतींपैकी यूडीएफनं सात, एलडीएफनं सहा जागांवर विजय मिळवला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.