केरळमध्ये,मतदार यादीचं विशेष पुनरीक्षण सुरू आहे. या अंतर्गत आतापर्यंत २ कोटी ६३ लाखांहून अधिक मतदारांना गणना नोंदणी अर्ज वितरित करण्यात आले आहेत, असं मुख्य निवडणूक अधिकारी रथन केळकर यांनी सांगितलं.
एकंदर मतदार संख्येच्या सुमारे ९४ टक्के लोकांना हे अर्ज देण्यात आले आहेत. संपूर्ण माहिती प्रणालीमध्ये अद्ययावत झाल्यानंतर ही संख्या वाढण्याची शक्यता आहे असंही केळकर यांनी सांगितलं. भारतीय निवडणूक आयोगानं या महिन्याच्या ४ तारखेला नऊ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे.