December 25, 2025 2:05 PM | kim jong un

printer

उत्तर कोरियामध्ये पाणबुडी निर्मितीचा आणि क्षेपणास्त्र चाचणीचा आढावा

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी काल एका पाणबुडीची निर्मितीचा आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या चाचणीचा आढावा घेतला. अण्वस्त्रसज्ज असलेलं हे क्षेपणास्त्र २०० किलोमीटर लांब असलेल्या लक्ष्याचा वेध घेऊ शकतं. उत्तर कोरियाच्या नौदलाचं आधुनिकीकरण करायच्या मोहिमेचा भाग म्हणून ही पाणबुडी विकसित केली जात आहे.